बातमी

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह, पतसंस्थेतर्फे पुंडलीक डाफळे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल श्री . व्यापारी नागरी सह् .पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. पुंडलीक डाफळे यांचा सत्कार करण्यात आला.

सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेने बेळगांव येथिल ग्रामिण विकास फांऊडेशनतर्फे आंतरराज्य
” आदर्श संस्था ” पुरस्कार मिळाल्याबद्दल व १ कोटी ९७ लाख ६९ हजार ८८५ रुपयाचा ऐतिहासिक असा विक्रमी नफा झालेबद्दल श्री. डाफळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

श्री. व्यापारी नागरीचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यानीं लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन, सर्व संचालक व सेवकवृंदाचे तोंडभरून कौतुक केले.व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार प्रसंगी लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे कार्यकारी संचालक श्री. नवनाथ डवरी, व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर , सर्व संचालक ,सेवकवर्ग उपस्थित होता. स्वागत श्री. हाजी धोंडिबा मकानदार यानीं तर आभार श्री. नामदेवराव पाटील यानीं मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *