बातमी

मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी-नारायण सह. पतसंस्थेची वार्षिक सभा ६ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मी -नारायण सहकारी पतसंस्थेची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( फक्त सभासदा करीता )रविवार दि .६ ऑगष्ट २०२३ रोजी दुपारी ठीक २ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे . सर्व सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे विद्यमान सभापती मा. श्री. अनंत फर्नांडीस यानीं केले आहे.

तसेच याच दिवशी संस्थेच्या मुख्य कार्यालय इमारतीचा २८वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे . त्यानिमित्य सकाळी ८वाजून ३० मिनिटानी संस्थेच्या मुख्य. कार्यालयात ” सत्यनारायण पूजेचे ” आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमासही सर्वानीं उपस्थित राहून संस्थेवरील आपुलकी , प्रेम वृद्धिगत करावा असे सभापती , उपसभापती , संचालक मंडळ व मॅनेजर नवनाथ डवरी यानीं कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *