कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे फौजदार चषक – 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदणी स्पोर्ट्स ने अंतिम सामना जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला व फौजदार चषकचा मानकरी ठरला.
यावेळी अंतिम सामना करनूर स्पोर्ट्स, करनूर व नांदणी स्पोर्ट्स, नांदणी यांच्यात झाला. यामध्ये नांदणी स्पोर्ट्स ने प्रथम क्रमांक पटकाविला. व करनूर स्पोर्ट्सचा निसटता पराभव होत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच तृतीय क्रमांक कोगील संघाने मिळविला, तर चतुर्थ क्रमांक गहिनीनाथ स्पोर्ट्स कागल या संघाने या पटकाविला. फौजदार चषक -2022 क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून व कर्नाटक निपाणी भागातून सोळा संघानी सहभाग नोंदवला होता.
संपूर्ण क्रिकेट सामन्यान मध्ये वैयक्तिक बक्षीसांमध्ये मॅन ऑफ द मॅच विद्यासागर नांदणी, मालिकावीर राजू कत्ते चाचा नांदणी, बेस्ट बॉलर मायटी राजू नांदणी व बेस्ट बॅट्समन निहाल शेख करनूर यांनी पटकाविले. पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चषकचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे स्वागत अनिकेत भोसले यांनी केले. प्रास्ताविक सागर खोत यांनी केले. पोलीस एजाज शेख यांचे फौजदार चषक क्रिकेट सामने यशस्वी पार पाडण्यासाठी मार्गदर्शन लाभले.
बक्षीस वितरण प्रसंगी मा. जिल्हा परिषद, अध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील, नसीरखान इनामदार, मुरगुड चे मा. उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, वंदुरचे मा. उपसरपंच बी.जी पाटील, जयसिंग घाटगे, महम्मद शेख, तातोबा चव्हाण, तानाजी भोसले, सदाशिव पाटील, कुमार पाटील, सचिन घोरपडे, बाळासो पाटील, सद्दाम शिरगुप्पे, आदिसह क्रिकेट शौकीन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.