सुमारे 6 लाख 60 रुपयांची चोरी
कागल ( विक्रांत कोरे ) : वंदूर ता. कागल येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर मध्ये दहा किलो चांदी चा प्रभावळ व एक किलो चांदीचा मुकुट असे सुमारे सहा लाख साठ हजार रुपयांची चोरी झाली आहे. मूर्तीस चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचा धका लावलेला नाही. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती आहे. या मंदिरामध्ये बुधवार दि. 9 रोजी रात्री साडेआठ ते गुरुवार दि. 10 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे .
घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी पहाटे पाच वाजता पुजारी गुरव यांनी मंदिरामध्ये प्रवेश करत असता. बंद मंदिराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून मंदिरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना चोरीची माहिती दिली.
ग्रामस्थांनी घटनेची माहिती कागल पोलिसांना कळविले. कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. श्वान पथक व तसेच ठसे तज्ञांना पाचारण केले. यावेळी श्वानने मंदिरापासून वंदूर – सिद्धनेर्ली धारण रोडच्या कडेला असणाऱ्या शेतापर्यंत माग काढला व शेतामध्ये लाकडी कमान निदर्शनास आली त्या कमानीची चांदी चोरांनी तिथून काढून घेतले असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौ.जयश्री देसाई, विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत. या घटनेने वंदूर व परिसरातील नागरिकांतून घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे गावातील चौकांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.