मुरगुड ( शशी दरेकर ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोप अंतर्गत “मेरी मिठ्ठी ,मेरा देश” अर्थात “माझी माती, माझा देश “ या अभियाना अंतर्गत मुरगूड नगर परिषदेमार्फत दिनांक ११/०८/२०२३ रोजी हु.तुकाराम भारमल चौक येथे सकाळी ८.४५ वा. शिलाफलक अनावरण, सकाळी ९.०० वा. ध्वजारोहण कार्यक्रम आणि विश्वनाथराव पाटील खुले सभागृह या ठिकाणी सकाळी ९.१५ वा.पंचप्रण प्रतिज्ञा व सकाळी ९.३० वा. वीरांना वंदन अंतर्गत शहरातील सर्व आजी माजी सैनिक,पोलीस,स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान , साय. ४ वा हुतात्मा स्मारक येथे वसुधा वंदन अंतर्गत ७५ स्थानिक वृक्षांची अमृतवाटिका विकसित करणे या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
तसेच शालेय विद्यार्थांसाठी दि. ११ ऑगस्ट रोजी चित्रकला व निबंध व १४ ऑगस्ट रोजी वकृत्त्व स्पर्धा यांचे आयोजन केले असून या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दि.१५/०८/२०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुरगूड येथे आयोजित केला आहे.
तसेच गतवर्षी प्रमाणे याही वर्षी ”हर घर तिरंगा”या उपक्रमाअंतर्गत दि .१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट ,२०२३ या कालावधीत मुरगूड शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज सन्मानाने फडकावा.या कालावधीत तिरंग्याचा अवमान होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी व वरील सर्व उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संदिप घार्गे यांनी केले आहे.