शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० घाटांचे सामान्य रुग्णालय व २५० खटांचे कॅन्सर रुग्णालय

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

मुंबई, दि. ९ : कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय व २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

Advertisements

छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थेतील विविध सुविधांच्या उपाययोजना करण्याबाबत आयोजित बैठकीत श्री. मुश्रीफ बोलत होते.

Advertisements

यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉक्टर अश्विनी जोशी, शिक्षण व औषध द्रव्ये विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींना रंगकाम , रस्ते दुरुस्ती, खिडक्या दुरुस्ती, दरवाजे दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी 48.45 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन सदरील कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील ऑडिटोरियम हॉलमधील नूतनीकरण करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या ११ कोटी ५० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून ऑडिटोरियम हॉलमध्ये आवश्यक कामे करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच; इतरही कामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!