‘परिवर्तन’ मार्फत निरपेक्ष भावनेने आयोजित केला जाणारा ‘शिदोरी’ उपक्रम जीवनाला दिशा देणारा.!
‘शिदोरी’ उद्घाटन प्रसंगी निवृत्त शिक्षक, प्रवचनकार ह.भ.प. चंद्रकांत माळवदे सर यांचे प्रतिपादन
मुरगूड ( शशी दरेकर ) : परिवर्तनच्या शिदोरी शिबिराचे उद्घाटन प्रतिवर्षी एका सज्जन व्यक्तिमत्वाच्या हस्ते केले जाते.मुरगुड येथील ह.भ.प. चंद्रकांत माळवदे सर असेच एक सज्जन, सात्विक, मृदू व आदर्श व्यक्तिमत्व, त्यात सरानी मुरगुड विद्यालय येथे 32 वर्षे इंग्रजीचे निष्णात शिक्षक म्हणून काम केले आहे. 20 वर्षे पत्रकार म्हणून काम केले आहे. डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवगड’ आध्यात्मिक ट्रस्टकडे सर मनोभावे कार्यरत आहेत. या ट्रस्टच्या ‘भक्तियोग’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
त्यांनी ‘गोवऱ्या व फुले’ या आत्मचरित्राचे लेखन केले आहे.त्यास राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे. मुरगुड येथील प्रसिद्ध अशा लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे सर संचालक आहेत तर अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या हस्ते ‘शिदोरी’चे उद्घाटन झाले.
यावेळी सरानी आपल्या भाषणात व्यक्तिमत्त्व चांगले घडण्यासाठी आवश्यक बाबींबाबत विविधांगी मार्गदर्शन केले.जीवनात सेवा महत्वाची,चांगले काम करत राहिले पाहिजे व अपेक्षा न ठेवता काम करण्याचा संस्कार म्हणजेच भगवद्गीतेचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरानी उत्तम व अवश्यक असे मार्गदर्शन केलेच शिवाय परिवर्तनच्या सेवाकार्याला शुभेच्छा दिल्या व या कार्यासाठी 7 हजार रु.ची देणगीही दिली.संस्थेचे मुख्य प्रवर्तक आदरणीय हभप सचिनदादा पवार यांनी सरांच्या प्रति नम्र कृतज्ञता व्यक्त केली.*