Kirit somaiya Live किरीट सोमय्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; कोल्हापूर मध्ये घेतली पत्रकार परिषद

कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले होते. श्री अंबाबाई मंदिरात त्‍यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, … Read more

Advertisements

ईडीच्या छाप्या नंतर आ. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

कागल : आम. हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखान्यावर ईडीच्या छाप्या नंतर आज ते कागल मध्ये घरी आल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

धर्माचा वापर करून मतांची बँक बळकट केली जात आहे

2014 सालापासून देशात सत्ता कोणाची आणायची ही प्रसारमाध्यमेच ठरवायला लागली आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांवरील लोकांचा विश्वास कमी होताना दिसतो. सध्याचे प्रसार माध्यमांचे चित्र लोकशाहीला घातक आहे असे दिसते. वृत्तपत्रे समाजाची गरज आहे. वृत्तपत्रामुळेच लोकशाही जिवंत आहे असे वाटत होते. पण वृत्तपत्रे प्रामाणिकपणाने काम करताना दिसत नाहीत. ती भांडवलदारांची बटिक झाली आहेत. वास्तविक वृत्तपत्रे जर प्रामाणिकपणाने … Read more

कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निकालाचा कल संमिश्र

कागल : कागल तालुका मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 13 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला. त्यापैकी पाच ठिकाणी बीजेपी ची सत्ता आलेली आहे. सहा ठिकाणी मुश्रीफ गट व तीन ठिकाणी मंडलीक व संजय घाटगे गटाचे चार सरपंचपदासाठी उमेदवारांनी बाजी मारलेले आहे. कागल तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा कल हा समिश्न असून यामध्ये भाजपचे बाचनी, रणदेवीवाडी, बामणी, निढोरी, … Read more

महा आवास अभियान ग्रामीण : सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा – अपर आयुक्त अनिल रामोड

पुणे : महा आवास ग्रामीण अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा, यासाठी प्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली ‘सर्वांसाठी घरे’ योजना यशस्वी करावी. त्यामुळे गरीब व सामान्य जनेतेचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी येथे केले. … Read more

गहिनीनाथ उरुस मर्दानी खेळांचे सादरीकरण

कागल : श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसनिमित्त खर्डेकर चौक कागल येथे शांतिदूत मर्दानी आखाडा यांच्यामाध्यमातून मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे प्रशिक्षक महेश कांबळे व प्रशिक्षिका सौ नीलम महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल येथील शांतीदूत मर्दानी आखाडा त्यांच्यावतीने उरूसानिमित्त मर्दानी खेळाचे … Read more

आटपाडीचा बाजार रस्ता सोडून दुतर्फा ओढा ओढापात्रात भरवा !

शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रात आणा –सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी (प्रतिनिधी ) : रहदारीला अडथळा न करता शनिवारचा आटपाडीचा सर्व बाजार, ओढा पात्रातील रस्ता सोडून लगतच्या दुतर्फा विस्तीर्ण ओढा पात्रातच भरवावा, तसेच शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रातच पुर्ववत आणावा . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे. आटपाडीचा शनिवारचा … Read more

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

कोल्हापूर, दि.3 : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 3 व 4 ऑगस्ट या कालावधीत श्री क्षेत्र चोपडाई देवी श्रावण षष्ठी यात्रा होत आहे.  यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या तसेच पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटर वाहनांचे पार्कींग होऊन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ शकते. भाविकांची सुरक्षा … Read more

विकास राज्यकर्त्यांच्या घरात लपून बसलाय

सध्याच्या काळात काही मंडळी भौतिक सुखे मिळतात, भरपूर पैसा मिळतो म्हणून राजकारणात येतात. राजकारणात आल्यावर आपल्याला झटपट श्रीमंत होता येतंच पण काही सन्मानाची पदेही मिळतात. म्हणजेच पैसा आणि पद असा दुहेरी फायदा होतो. शिवाय पै-पाहुण्यांचे, मुलाबाळांचे कल्याण करता येते असे वाटते. राजकारण आता लोकांचा व्यवसाय झाला आहे. शून्य भांडवलातून हा व्यवसाय चालू करता येतो. शिवाय … Read more

सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार – हेमंत पाटील

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतर नाटकाचा पहिला अध्याय संपला आहे.पहिल्या अंका नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. पंरतु, बंडखोर शिवसेना गट आणि मुळ शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत तुर्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे पारडे जड झाल्याने एकनाथ – देवेंद्र यांचे ‘ईडी’ सरकार टिकेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत … Read more

error: Content is protected !!