ताज्या घडामोडी

एकजुट समाजनिर्मितीसाठी गांधीविचार प्रेरक – एस. डी. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – 150 वर्षाच्या ब्रिटीशाच्या जुलमी राजवटीतुन भारताला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींचे योगदान खुप मोठे योगदान आहे.पण स्वातंत्र्याचा 75 वर्षानंतर धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एकजुट निर्माण करण्याची गरज आहे अशा या एकजुट समाजनिर्मितीसाठी गांधी विचारच प्रेरक ठरतील असा ठाम विश्वास एस.डी.पाटील यांनी व्यक्त केला.मुरगुड,ता.कागल येथील समाजवादी प्रबोधनी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी स्मृतीदिना निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व समाजवादी प्रबोधनी शाखा.मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीचा 75 वा स्मृतीदिन संपन्न झाला.या कार्यक्रमात चिंचवाड हायस्कूल चिंचवाड चे एस.डी.पाटील सर यांनी *महात्मा गांधी समजून घेताना”* या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिस मुरगुड शाखेचे अध्यक्ष भिमराव कांबळे होते.स्वागत अंनिस कार्याध्यक्ष शंकर कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक बी.एस.खामकर यांनी केले.

पुढे ते म्हणाले की,गांधीजीचे सरळ,सोप्या भाषेत मांडलेले तत्वज्ञान हे जीवन जगण्याचा दृष्टीकोन देणारे आहे.त्यामुळेच सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या गांधीचे तत्वज्ञान घेवून सरदार वल्लभभाई पटेल,पंडित जवाहरलाल नेहरू,नेल्सन मंडेला,मार्टीन ल्युथर किंग सारखी महान व्यक्तिमहत्वे घडलीत.त्यामुळे नथुराम गोडसे सारख्या भ्याड प्रवृत्तीने गांधीना संपविले पण गांधी विचार कधीच मरू शकत नाहीत.

गांधी आणि आंबेडकर विचारधारेमध्ये भेद निर्माण करून जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत . पण गांधी-आंबेडकर विचारधारा ही एकच असून गांधी, आंबेडकरांच्या विचारांमुळेच भारत देश एकसंध बांधला गेला आहे हे समजून घेण्याची गरज आहे . असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती अध्यक्ष भिमराव कांबळे (तात्याजी ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

यावेळी समाजवादी प्रबोधिनी मुरगुड शाखेचे संस्थापक दलितमित्र डी.डी.चौगले,ज्येष्ठ नागरीक संघ मुरगुडचे अध्यक्ष गजानन गंगापूरे,अंनिसचे प्रधान सचिव प्रदीप वर्णे,युवा विभाग प्रमुख विकास सावंत,प्रांजल कामत,विक्रम पाटील,कृष्णात कांबळे,जयवंत हावळ,पापा जमादार,चंद्रकांत जाधव,सिकंदर जमादार,समाधान सोनाळकर, सुनिल डेळेकर,संजय घोडके,शिवप्रसाद बोरगावे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन सुतार यांनी केले तर आभार बबन बारदेस्कर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *