बातमी

मुरगूडमध्ये जेष्ठ नागरीक संघामार्फत ” जागतिक योग दिन “उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघ मुरगूड या संस्थेच्यावतीने ” जागतिक योग दिन ”संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

२१ जून हा दिवस ” जागतिक योग दिन ” म्हणून साजरा केला जातो . मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे . योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक , आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल होण्यास मदत होते.
प्रारंभी जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री . गजाननराव गंगापूरे यानीं मानवी जीवन निरोगी व सुखकर होण्यासाठी योगाचे महत्व पटवून सांगितले. योग मार्गदर्शक श्री . जयवंत हावळ यानीं मन व शरीर चांगले रहाण्यासाठी योगासने करण्याची नितांत गरज आहे. जेष्ठानीं मान , पाठ , कंबर , सांधे , हात , पाय इत्यादी मजबूत होण्यासाठी योगासनाव्दारे प्रात्यक्षिके करवून घेतली.

दुसरे योग मार्गदर्शक श्री. रंगराव चौगले यानीं प्राणायम व ध्यान यांचे जीवनातील महत्व समजावून सांगून प्राणायमाचे प्रकार प्रात्यक्षिकाव्दारे करवून घेतले. या शिबिराचा अनेक जेष्ठानीं लाभ घेऊन योगशिबीर अत्यंत उपयुक्त झाल्याची भावनां व्यक्त केली. स्वागत श्री . गजानन गंगापूरे यानीं केले . तर आभार श्री. विनायक हावळ यानीं मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *