बातमी

हर हर महादेव या चित्रपटाचा वाद टोकाला

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झी स्टुडीओला दणका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट १८ डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टिव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनिशी करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मधील झी वाहिनीच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले.

यावेळी मुंबई पोलिसांनी या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत सरकारला खडा सवाल विचारला आहे.

यावर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणा विरूध्द आंदोलन करणान्या मावळ्यांना पोलिसांनी अक्षरश: जनावरासारखी फरफट करत ताब्यात घेतले ! सरकारने शिवप्रेमींचा आवाज दाबण्यापेक्षा शिवद्रोह्यांना अद्दल घडवा, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.

आपल्या पोस्ट मध्ये पुढे छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, या राज्यात शिवाजी महाराजांचा चुकीचा व विकृत इतिहास दाखवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भामटे मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर बंधने घालण्याचे व कारवाई करण्याचे धाडस कोणतेच सरकार दाखवत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संविधानिक मार्गाने लढणाऱ्या शिवभक्तांना मात्र इतकी हीन व क्रूर वागणूक दिली जाते, हा कोणता न्याय आहे ? हे कसले प्रशासन आहे ?

या संपूर्ण प्रकरणात सरकार केवळ अंगकाढू भूमिका घेत असल्याचे सांगत शिवभक्तांची भावना व विषयाची दाहकता लक्षात घेत सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे व हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्यास बंदी घालावी. अन्यथा याचा जितका त्रास झी स्टुडिओला सोसावा लागेल, तितकाच सरकारलाही सोसावा लागेल, असा सज्जड इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिलेला आहे.

स्वराज्य संघटनेचे करण व गायकर, धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, नि आप्पासाहेब कुढेकर, मंगेश र कदम, गणेश कदम, केशव गोसावी, तिरुपती भगणुरे, सदानंद पुयड, राहुल गावडे, अशिष हिरे, त रूपेश नाठे, विनोद परांडे, द्वारकेश अ जाधव, दादाराव बोबडे, विक्रम , कदम, नवनाथ शिंदे, दिनेश व नरवडे, वैभव दळवी, राहुल लांडगे, स‍ विजय वाहुळे, प्रथमेश पुंडे, महेश म पुंडे यांच्यासह स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये अ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *