मुरगूड ( शशी दरेकर ) : युगपुरुष छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम आजही अंगावर शहारे आणतो. शिवाजीराजा हा रयतेचा खऱ्या अर्थाने जाणता राजा होते. तरुणांनी शिवाजीला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे. तरुणांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा. त्यातून शिवरायांचे चरित्र आणि चारित्र्य डोळ्यासमोर येईल असे प्रतिपादन माजी प्राचार्य रामकुमार सावंत यांनी केले. मुरगूड येथील शिवभक्त धोंडीराम परीट यांच्या पुढाकाराने मुरगूड मध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात व थाटात संपन्न झाली. या कार्यक्रमात शिवरायांचा आदर्श या विषयावर रामकुमार सावंत यांचे व्याख्यान झाले.
प्रथम श्रीमती मंगल कांबळे यांच्या हस्ते छ. शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ. सायरा बागवान यांच्या हस्ते भवानी तलवार पूजन करण्यात आले. यावेळी शिवभक्त धोंडीराम परीट यांनी शिवप्रार्थना सादर केली. यावेळी रुग्णांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मुरगूडमधील २३ औषध दुकानदारांचा कृतज्ञतापूर्वक सपत्नीक सत्कार करण्यात आला. धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ . संजय सुतार ‘राजू शिंदे’ माजी सैनिक नितीकेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार झाला.
या कार्यक्रमास मुरगूड शहर पत्रकार फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुनिल डेळेकर, सौ. उमा युवराज मोरबाळे, पुष्पा शेंडे, सौ. भारती पाटील, ट्रिजा बारदेस्कर, सौ. अर्चना कुलकर्णी, एकनाथ पोतदार, आनंदा गोरुले, अमर गिरी, अमित दरेकर, विशाल मंडलिक, ओंकार दरेकर, सनी गवाणकर यांच्यासह शिवप्रेमी मोठया संख्येने-उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक विकी साळोखे यांनी केले . यावेळी व्ही .आर. भोसले व मोहन ढेरे यांनी मनोगत मांडले . प्रा विनय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर विकास सावंत यांनी आभार मानले.