बातमी

पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

पिंपळगाव खुर्द (अण्णाप्पा मगदूम) : पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार. पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे मोठ्या उत्साहामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला पिंपळगावच्या माननीय सरपंच शितल नवाळे ,उपसरपंच नाना चौगुले ,ग्रामपंचायत सदस्य असिफ शेख ,पिंटू कांबळे, सौ. परीट, पत्रकार अण्णासो मगदूम यांचा सत्कार मिलिंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकरराव शिर्के मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच सौ.शितल नवाळे यांनी विद्यार्थी दशेमध्ये कला व क्रीडा या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घेतला पाहिजे तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे सांगितले.

https://youtu.be/NYLvOqCiF4g

प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी शाळेमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची व यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दिली. मिलिंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री मधुकरराव शिर्के यांनी या स्नेहसंमेलनासाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमधील उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी सदर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी गीत गायन, वाद्य वादन, मर्दानी खेळ, लेझीम नृत्य, धनगरी नृत्य, लावणी, पाळणा, देशभक्तीपर गीते, लेझी डान्स, कॉमेडी डान्स, विनोदी गीत प्रकार, अशा विविध कलागुणांचे सादरीकरण केले. पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या तीन लघुनाटिका तसेच सावित्री फुले यांच्या जीवनावरील लघुनाटिकेचे सादरीकरण करण्यात आले.

विनोदी नाट्यछटेने सर्व प्रेक्षकांना खळखळून हसविले. कार्यक्रमाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित नृत्याने करण्यात शिवाजी महाराजांची एन्ट्री घोड्यावरून वाजत गाजत करण्यात आल्यामुळे सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.जवळपास 33 कार्यक्रमांचे सादरीकरण या स्नेहसंमेलमध्ये करण्यात आले.

शाळेमधील सर्वच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या उपक्रमामध्ये नोंदविला होता. पालक व माजी विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन करताना सक्रिय मदत केली. संस्कृती विभाग प्रमुख श्री वैभव घाटगे सर, सौ.अस्मिता येरुडकर मॅडम, श्री.अनिल माळी सर, श्री. संदीप दिंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले होते.

One Reply to “पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *