बातमी

मुरगुडमध्ये ३ ते ५ फेब्रुवारीला कुस्ती स्पर्धा

“लाल आखाडा चषक संकुल कुस्ती स्पर्धा, , मॅटवरील कुस्ती स्पर्धा, विविध सोळा वजनी गटात घुमणार शड्डु… “

मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने व विश्वनाथराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणित लाल आखाडा मुरगुड यांच्यावतीने
माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी अखेर मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा विविध 16 वजनी गटात आयोजित करण्यात आल्याची माहिती विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे,अँड.सुधिर सावर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी एक लाख 25 हजार 625 व लाल आखाडा संकुल चषक, चांदीची गदा , द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार 616 रुपये रोख व चषक तृतीय क्रमांकासाठी 50हजार 616 रुपये रोख व चषक तर चतुर्थ क्रमांकासाठी 21 हजार 616 व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहेत 57 किलो वजनी गटासाठी उपमहाराष्ट्र केसरी कै.प्रकाश चौगले चषक तर 46 किलो गटासाठी कै.अर्जुन मसवेकर चषक कुमार केसरी गदा पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.

https://youtu.be/NYLvOqCiF4g

विविध गट व बक्षिसे पुढील प्रमाणे… 84 किलो गट प्रथम 25हजार, द्वितीय 16हजार, तृतीय १० हजार, चतुर्थ 5 हजार व चषक, ७४ किलो गट प्रथम 21हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 11हजार, चतुर्थ 4 हजार व चषक ,65 किलो गट प्रथम 11हजार, द्वितीय 8हजार, तृतीय 6हजार, चतुर्थ 3 हजार व चषक, 61 किलो गट प्रथम 10हजार, द्वितीय 7हजार, तृतीय 5हजार, चतुर्थ 3 हजार व चषक ,60 किलो गट प्रथम 10हजार, द्वितीय 7 हजार, तृतीय 5हजार, चतुर्थ 3 हजार व चषक, 57 किलो गट प्रथम 6हजार, द्वितीय 4हजार, तृतीय 3हजार, चतुर्थ 1500 व चषक ,52 किलो गट प्रथम 6हजार, द्वितीय 4हजार, तृतीय 3 हजार, चतुर्थ 1500 व चषक, 46 किलो गट प्रथम 5हजार, द्वितीय 3 हजार, तृतीय 2हजार, चतुर्थ 1000 व चषक ,40 किलो गट प्रथम 5हजार, द्वितीय 3हजार, तृतीय 2 हजार चतुर्थ एक हजार व चषक, 35 किलो गट प्रथम 4हजार, द्वितीय 3हजार, तृतीय 2हजार, चतुर्थ एक हजार व चषक ,32 किलो गट प्रथम 3हजार, द्वितीय 2हजार, तृतीय 1000 चतुर्थ 700 व चषक, 30 किलो गट प्रथम 3हजार, द्वितीय 2हजार, तृतीय 1000 चतुर्थ 700 व चषक ,28 किलो प्रथम 3हजार, द्वितीय 2हजार, तृतीय1000 चतुर्थ 700व चषक, 25 किलो प्रथम 3हजार, द्वितीय 2हजार, तृतीय 1000, चतुर्थ 700 व चषक, 20 किलो प्रथम 1000, द्वितीय 700, तृतीय 500 ,चतुर्थ 200 व चषक देण्यात येणार आहे.

यावेळी स्वागत राहुल वंडकर यांनी केले .प्रसंगी वसंतराव शिंदे, सुधीर सावर्डेकर, संजय मोरबाळे, नामदेव भांदीगरे, जगन्नाथ पुजारी, सम्राट मसवेकर,राजु आमते,अमर देवळे,राजु चव्हाण, गुरुदेव सुर्यवंशी, पांडुरंग पुजारी, रंजीत मगदूम ,अनिल शिंदे,राजू सोरप उपस्थित होते आभार नामदेव भांदीगरे यांनी मानले.

या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणे गॅलरी व क्रीडांगण तयार करण्यात येणार असून नियमावली त्याप्रमाणेच आहे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत उतरलेले पैलवान या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत . ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून अन्य राज्यातून पैलवान उतरणार असल्यामुळे एक आकर्षण बनले आहे .यापूर्वी मुरगूड मध्ये कधीही खुला गटातील स्पर्धा झाल्या नाहीत.खुल्या गटातील स्पर्धा ह्या वजनी गटात आयोजित केल्या होत्या .पण यावेळी त्या खुल्या ठेवल्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. यूट्यूब च्या माध्यमातून त्याचे प्रक्षेपण केले जाणार असल्याने त्या घरबसल्या पाहता येणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *