बातमी

मुरगूडमध्ये वाढीव घरफाळा निषेधार्थ भाजप व मुरगूडवाशिया तर्फे नगरपरिषदेवर मोर्चा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील मिळकतधारकांच्या मालमत्ता करात (घरफाळा) प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपच्या व मुरगूडवाशियांच्या वतीने मुरगूड नगरपालिकेवर मोर्चा काढून घरफाळा वाढीस विरोध दर्शविण्यात आला. दर चार वर्षांनी होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मुरगूड शहरातील घरांना घरफाळा आकारणी करण्यात आली आहे.

घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा वर्गीकृत रचनेद्वारे ही आकारणी करण्यात आली आहे. मात्र ती अन्यायी आहे. शहराचे विकसीकरण तसेच पालिका ‘क’ वर्गातील आहे. असे असताना याचा विचार करता वाढीव घरफाळा आम्हाला मान्य नसल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. या संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तेव्हा ही घरफाळावाढ मागे घ्यावी अशी मागणी भाजपच्या व मुरगूडवाशियाच्या-वतीने पालिकेवर मोर्चा काढून करण्यात आली.

यावेळी प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजना लाभार्थ्यांना अनुदान देण्यास विलंब होत आहे. ते तात्काळ मिळावे. तसेच या विभागाचे काम पाहणारे पालिकेतील तंत्र अधिकारी हे लाभार्थ्यांची कुचंबणा करतात. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदरचे निवेदन पालिका मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी दगडू शेणवी म्हणाले कोरोणा , पूरपरस्थिती, व जनावरांच्या लंपीच्या आजारामुळे नागरिक आणि शेतकरी मेटाकुटीला आला आहे . त्यामुळे हा वाढीव घरफाळा आकारणी मागे घ्यावी.

पालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपचे अनंत फर्नाडिस, दगडू शेणवी , दत्तात्रय जाधव, अमर चौगले, सुशांत मांगोरे, किरण गवाणकर, धोंडीराम मकानदार, विनय पोतदार, निवास कदम, किशोर पोतदार, भगवान गुरव, प्रकाश सणगर, संग्राम साळोखे, नाना डवरी, सतिश साळोखे, विजय गोधडे, सदाशिव गोधडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *