कागल : मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे. जेथे जाल तेथे चांगले यश मिळवून कुटुंबाचे, गावाचे, शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयनाराजे घाटगे यांनी केले. कागल येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये परीक्षेत विशेष गुणवत्तेसह व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ झाला.
व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्रीमंत अखिलेशराजे घाटगे, सहसचिव पी. बी. घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मानचिन्ह व विविध मान्यवरांनी जाहीर केलेले बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील तेली, शुभांगी कांबळे, नम्रता खोत, अर्पिता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत मुख्याध्यापक व्ही. डी. मगदूम यांनी केले. आभार यु.के. बामणे यांनी मानले. कार्यक्रमास इकबाल नदाफ, शितल पाटील, रामचंद्र पाटील, सुनील कांबळे, विश्वजीत कुलकर्णी, सचिन जाधव, रमेश कांबळे आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.