कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.
भोगावती नदीवरील – तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी व खोची.
दुधगंगा नदीवरील – दत्तवाड
कासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे असे 20 बंधारे पाण्याखाली आहेत.
पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 28.4 फूट, सुर्वे 25.8 फूट, रुई 56 फूट, इचलकरंजी 53, तेरवाड 47.8 फूट, शिरोळ 41 फूट, नृसिंहवाडी 40.3 फूट, राजापूर 26.7 फूट अशी आहे.
जिल्ह्यातील धरण पाणीसाठा
कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आली आहे.
राधानगरी – 8.31 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.55 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.6 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 20.36 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.59 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.40 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 3.30 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.22 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.89 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.23 (1.240 टी. एम. सी ), कोदे ल.पा. 0.21 (0.214 टी. एम. सी )
You have noted very interesting details! ps decent website.?