
साक्षी गोरुले
मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागाची विद्यार्थिनी साक्षी अशोक गोरूले हिची येत्या १९ डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या महावीर कॉलेजवर होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वानदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिद्धनेर्ली येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ४६ ते ४९ वजनगटात तीने अजिंक्यपद पटकावल्याने तिची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला तायक्वांदो प्रशिक्षक अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, अँड. वीरेंद्र मंडलिक, प्राचार्य पी. डी. माने, उपप्राचार्य रवींद्र शिंदे, वडील अशोक गोरुले यांचे प्रोत्साहन मिळत आहे.