बातमी

कागल पंचतारांकित चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात

कागल(विक्रांत कोरे) :
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक जवळील चौकात इनोव्हा कार व दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोघे व इनोव्हा कार मधील चालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर कार मधील इतर चौघेजण जखमी आहेत. जखमीना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोटरसायकल वरील सोनु कुमार,पंकज कुमार व इनोव्हा कारचालक सुरजीत गोपी जांभेकर हे तिघेजण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार,
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मेट्रो हायटेक जवळील चौकात इनोव्हा कार भरधाव वेगाने जवाहर कारखान्याच्या दिशेने जात होती. दरम्यान दुचाकी चालक ही भरधाव वेगात जवाहर कारखान्याच्या दिशेने वळण घेत होते. इनोव्हा कारणे दुचाकीस जोराची धडक दिली.

मोटर सायकल क्रमांक सीबी झेड एक्सट्रेमmh- 09 -DY-8049 वरील दोघे इसम वाहनासह 50 फूट फरपटत गेले. दोन्ही वाहनांचे इतर साहित्य रस्त्यावर विखरून पडले होते. दुचाकी वरील दोघे इसम रस्त्यावर थोड्या अंतरावर पडले होते. त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता.

इनोव्हा क्रमांक के ए- 30 एम बी -3333 ने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यावेळी कार वरील चालकाचा ताबा सुटून कार डिव्हायडरमध्ये घुसली .कारचा समोरील इंजिनचा निम्या भागाचा चक्काचूर झाला. जोराच्या झालेल्या धडकेत एअर बॅग मुळे कारमधील चौघेजण बचावले. मात्र त्यांना दुखापत झाली. सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमण्ड चौक व मेट्रौ हायटेक चौकात वरचेवर अपघात होत असल्याने स्पीड ब्रेकरची मागणी कामगार वर्गातून होत आहे.. अपघात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री.तिवडे व हावलदार श्री तेलंग हे पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *