बातमी

कागलमधील झोपडपट्टी धारकांना मिळाली हक्काची मालकीपत्रे -आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश

कागलमधील कुरणे वसाहत ठरली राज्यातील पहिली नियमित झोपडपट्टी

कागल, दि. २४: आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमधील कुरणे वसाहतीमधील ५४ झोपडपट्टीधारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली. नियमितीकरण झालेली कुरणे वसाहत ही राज्यातील पहिलीच झोपडपट्टी ठरली आहे. या वसाहतीच्या नियमितीकरणासाठी आमदार हसनसाहेब मुश्रीफ व नगरसेवक सतीश घाडगे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना झोपडपट्टीधारकानी व्यक्त केली. नियमितीकरण झालेल्या ५४ झोपडपट्टीधारकांच्या हस्ते आमदार हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, कागल- मुरगुड मार्गावरील वडवाडी येथील कुरणे वसाहतीमध्ये या झोपड्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. या नियमितीकरणामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपड्या उभारलेल्या ५४ झोपडपट्टीधारकांना याचा लाभ झाला आहे.

भाषणात आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, सोमवारी घटस्थापना आहे. त्यादिवशी ५४ झोपडपट्टी धारकांच्या स्व- मालकीच्या हक्काच्या घरात देव -देवतांची प्रतिष्ठापना होणार आहे, याचे आत्मिक समाधान आहे. शहरातील राजीव गांधी वसाहत, बिरदेव वसाहत, रेल्वेलाईन वसाहत, स्मशानभूमी लाईन वसाहत, सांगाव नाका मातंग वसाहत, पसारेवाडी वसाहत या इतर झोपडपट्ट्या नेहमीची करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, नगरसेवक सतीश घाटगे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक विवेक लोटे, संदीप भुरले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, भरत सोनटक्के आदी उपस्थित होते.

“आमदार मुश्रीफांचाच पाठपुरावा……….”
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, निव्वळ स्टंटबाजी करून जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी अहोरात्र झिजावे लागते. या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करीत- करीत आतापर्यंत दहा ते बारा बैठका या प्रश्नावर झाल्या आहेत. आमदार हसनसाहेब मुश्रीफ व नगरसेवक सतीश घाडगे यांच्या पाठपुराव्यामुळेच झोपडपट्टीधारकांचा हा प्रश्न कायमचा निकालात निघालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *