03/12/2022
0 0
Read Time:5 Minute, 39 Second

मुरगूड ( शशी दरेकर ) : इथेनॉल निर्मिती हे भविष्यात आपल्या कारखान्यास वरदान ठरणार आहे., आपल्या देशाला दरवष ५५० कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाची दैनंदिन निर्मिती क्षमता दुप्पट करणे, दैनंदिन उस गाळप क्षमता वाढविणे. तसेच सह वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सभासदांचे हित जपणारा आहे. सभासदांनी स्वभांडवल उभारणीसाठी ज्याच्या त्याच्या अर्थिक कुवती नुसार ठेवी च्या रूपाने स्वनिधी द्यावा. असे आवाहन काररवान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी केले.

सदाशिवराव मंडलिक कागल तालूका सहकारी साखर कारखाना लि., हमिदवाडा- कोलगे या साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली यावेळी अध्यक्ष पदावरून खासदार श्री मंडलिक बोलत होते. ते म्हणाले इथेनॉल साठवणूकीस केंद्र शासनाकडून प्राधान्य देवून विविध सवलती देत आहे. या सवलतींचा फायदाही आपल्या कार खान्यास भविष्यात होणार आहे.

सभासद हिताच्या साऱ्या गोष्टींचा सभासदानी स्वीकारल्याने स्वनिधी साठी अधिकाधिक ठेवी द्याव्यात अशी विनंती सभागृहाला केली. आजवर सभासदांनी केलेल्या सहकार्या बदल कृतज्ञता व्यक्त करून सर्व उत्पादक सभासद तसेच कारखाना कार्य क्षेत्रातील उस उत्पादकांनी पिकवलेला सर्वच्या सर्व विषय कारखान्यास गळीतास पाठवावा असे आवाहनही चेअरमन खासदार मंडलिकांनी केले.
सुरुवातीला विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक एन वाय पाटील यांनी केले. विषय निहाय चर्चा होऊन विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळ्याच्या गजरात मंजूर करण्यात आले. आदी सूचना उपस्थित सभासदांनी मांडल्या.

कारखान्याने उसपीक स्पर्धा घ्यावी. विभाग निहाय शेती सेंटर कार्यालयामध्ये रोखीनी खत विक्री केंदे सुरु करावीत. उस उत्पादक सभासदांचे मेळवे घेऊन , तज्ञांकडून उस पिकाबाबत मार्गदर्शन देण्याची व्यवस्था करावी. स्वनिधी साठी ठेवी जमा करण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यावर सोपवावी. सभासदांच्या जमीनीचे माती परीक्षण करण्यात यावे. ऊस बियाने प्लॉट तयार करावेत.
आदी सूचना उपस्थित सभासदांनी मांडल्या.

या साऱ्याच सूचना स्वागतार्ह आहेत. यांची कारखाना व्यवस्थापना कडून कार्यवाही केली जाईल. असे सभाध्यक्ष खासदार श्री मंडलिक यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत संजय राजाराम पाटील कुरुकली, जयसिंगराव भोसले मुरगूड , एस.व्ही. चौगले मुरगूड , आनंदा पाटील मळगे, अडव्होकेट सासने, शिवाजी पुरीबुवा चिमगाव आदीनी भाग घेतला. सर्व श्री सत्यजित उर्फ भैया पाटील सोनाळी, अतुल जोशी कागल , राजेखान जमादार यांनी मनोगत व्यक्त केले .
सभेला मुरगूडचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, पांडू भाट , नामदेवराव मेंडके, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, माजी संचालक नारायण मुसळे, सांगले मामा , मारुतीराव चोथे, माजी उप सभापती विजय भोसले, बिद्री साखर कारखान्याने माजी संचालक बाजीराव गोधडे , विद्यमान व्हाईस चेअरमन बापूसो भोसले -पाटील , सर्व विद्यमान संचालक, आर बी पाटील , नंदू पाटील बिद्री, कार्यकारी संचालक एन वाय पाटील, सेक्रेटरी रावसाहेब बोंगार्डे यांच्यासद सर्व खाते अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संखेने सभासद हजर होते.

टाळ्यांनी सभागृह दणाणले सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना लि., हमिदवाडा- कोलगे या सद्याच्या नावात बदल करून, लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालूका सहकारी साखर कारखाना अशी दुरुस्ती करावी अशी सूचना काररवाना सभासद सत्यजित पाटील यांनी मांडली. मंजूर मंज२ अशा टाळ्यांचा गजराने सभागृह दणाणले.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!