बातमी

मुरगूड नगरपालिकेला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर, दिल्लीत होणार सन्मान

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरपरिषदेला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुन्हा एकदा मुरगूड नगरपालिकेचा दिल्लीत सन्मान होणार असून या योजनेचा ब्रँड अॅम्बॅसिडर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे . असे गौरवउद्गारॲड विरेंद्र मंडलिक यांनी काढले.

नगरपरिषदेस जाहिर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . अॅड मंडलिक म्हणाले , खा . संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून मुरगूड नगरपरिषद देशात मॉडेल नगरपरिषद बनली आहे.

निवडणूकीत दिलेल्या जाहिरनाम्याची १०० % पुर्तता केली आहे .यामध्ये प्रामुख्याने छ . शिवाजी महाराज पुतळा , अंबाबाई मंदीर , सुधारीत पाणी पुरवठा योजना , रस्ते डांबरीकरण , हायमास्ट दिवे , दोन बगीचे , स्वागत कमान ,चौकांचे सुशोभिकरण , कचरामुक्त शहर , घंटागाडी यांचा समावेश आहे .

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत मुरगूड नगरपरिषदेने विविध घटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे . मुरगूड ‘नगरपरिषदेने हागणदारी मुक्त शहरामध्ये ODF ++
हा दर्जा प्राप्त केला आहे. तर कचरामुक्त शहरामध्ये 5 star दर्जा मिळवून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कामगिरीत सातत्य राखल्यामुळे हा गौरव होत आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये उकृष्ठ कामगिरी केल्या बद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.

माझी वसुंधरा अंतर्गत एक कोटी , स्वच्छ सर्वेक्षणात दहा कोटी पैकी पाच कोटी निधी मिळाला आहे . आजच्या या निवडीमुळे पालिकेला पाच कोटीचे बक्षीस स्वरूपात निधी मिळणार आहे . पालिकेचा यापूर्वी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते व मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेकदा सन्मान करण्यात आला आहे . स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये चांगली कामगिरी करण्यामध्ये खास संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन करता आले आहे . यामध्ये नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष , मुख्याधिकारी , सर्व नगरसेवक , नगरसेविका , अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

कर्मचा-यांचे अनमोल योगदान मुरगुड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षण योजनेअंतर्गत राबवलेली मोहीम आपल्या पदाचा ,हुद्याचा विचार न करता आपलं गाव आपली जबाबदारी या भावनेतून सर्वांनी झोकून देऊन स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्यासाठी कर्तव्य बुद्धीने योगदान दिले त्याचे फलित नगरपरिषदेला दुसऱ्या वेळेला राष्ट्रपतींचे हस्ते सन्मानित करण्यात येत आहे . अशी कौतुकाची थाप अॅड विरेंद्र मंडलिक यांनी त्यांचा सत्कार प्रसंगी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *