बातमी

सत्काराने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते : संजयबाबा घाटगे

द.वडगाव येथे श्री हरी बोला समितीमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

व्हनाळी (सागर लोहार) : गुणवत्तेमध्ये मुलींचा टक्का जास्त आहे याच कारण म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची असणारी एकाग्रहता,जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम व सर्वस्व पणाला लावून मुली शिक्षण घेतात म्हणूनच सर्व सरकारी कार्यालयामध्ये मुलीच दिसतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच समाधान न मानता सर्वच क्षेत्रात आपले अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा प्रकारांच्या सत्कारामधून मुलांचा अत्मविश्वास व मनोबल वाढत असते असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.

द.वडगाव ता.करवीर येथे श्री हरी बोला सत्कार समितीमार्फत आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी 10वी,12 वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यी,आदर्श शिक्षकांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी हरी बोला संस्थेचे संस्थापक भैरू कोराणे, काॅ.शिवाजी मगदूम,सरपंच अनिल मुळीक,धनराज घाटगे, यांनी मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमास विश्वास दिंडोर्ले, शिवाजी चौगुले,महादेव कोराणे,एम.बी.पाटील,उपसरपंच सौ.सुरेखा लोहार ,विकास सासणे,विशाल थेरगावे,प्रविण सासणे,अनिल गुरव,प्रदिप परिट,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ उपस्थीत होते.
स्वागत भैरू कोराणे (माऊली) यांनी केले आभार दतात्रय देवकुळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *