
अन्नपुर्णा पाणी पुरवठा संस्थेची 30 वी सर्वसाधारण सभा संपन्न, 25 लाख निवळ नफा
व्हनाळी(सागर लोहार) : सहकार ही सामान्य माणसाची चळवळ आहे. त्याच्या माध्यमातून सर्वसमावेशक पिढ्यानपिढ्याचे कोट कल्याण करता येते. हे अन्नपुर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेने दाखवून दिले आहे. त्यामुळे सहकार शक्तीचे अन्नपुर्णा हे उत्तम उदाहरणच आहे. सभासदांनी दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळेच यंदाच्यावर्षी संस्थेला 25 लाखा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन ,माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली.
व्हनाळी ता.कागल येथे श्री अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या 30 व्या वार्षीक जाहिर सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थीत होते. श्री घाटगे पुढे म्हणाले, शेतकरी सभासदांची आर्थिक उन्नती हेच ब्रिद घेवून काम करतांना गेल्या तीस वर्षात संस्थेने तीन स्टेज मध्ये सुमारे 5 हजार एकर शेती ओलीताखाली अणली आहे. पाणी बचतीसाठी संस्थेने पोटलाईन घातली आहे. संस्थेची फिक्स ठेव सुमारे 3 कोटी 77 लाख इतकी आहे. सचिव,कर्मचारी यांच्या योग्य नियोजनामुळे ही योजना आदर्शवत चालू आहे. अन्नपुर्णा शुगर कारखान्याच्या च्या उभारणीत या पाणी पुरवठा संस्थेचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वागत संचालक रतन कांबळे यांनी केले. अहवाल वाचन मुख्य सचिव आकाराम बचाटे यांनी केले. सभासदांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. संचालक विलास पाटील, विश्वास पाटील,अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी ज्ञानदेव पाटील,के.बी.वाडकर,सुधाकर हात्रोटे,किरण पाटील,सुरेश मर्दाने,बाजीराव पाटील,विलास कौंदाडे,एम.टी.पोवार,धोंडिराम एकशिंगे,मॅनेंजर रघुनाथ पाटील, उपस्थीत होते. सुत्रसंचलन सुभाष पाटील यांनी केले. आभार गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी मानले.