कागल राष्ट्रीय महामार्ग वर गॅस ट्रक घसरला

कागल : कागल येथील राष्ट्रीय महामार्ग वर प्रोपीलीन गॅस वाहन करणार ट्रक (KA01AG7619) साईड रोड वर घसरला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू असून रस्ता दळणवळणासाठी अरुंद झाला आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.रस्ते विकास महामंडळाने या बाबी कडे गांभीर्याने दखल घ्यावी.

हायवे पोलिसांच्या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता करा….!

कागल / प्रतिनिधी : कागल शहरा लगत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी आहे. वळणदार रस्ता आणि चढ आहे. याचा फायदा घेत, हायवे पोलीस वाहनधारकांना बरोबर बकरा करतात. वाहनांच्या अडवणुकीमुळे अनेक वेळा या ठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात झालेले आहेत. वाहनधारकांची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी कागल तालुक्यातील विविध पक्षांचे अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयास  ५० बेडसाठी मंजूरी !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयास खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामूळे ५० बेडला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.             मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत २५ ते३० गावांतील रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता या रुग्णालयाचे विस्तारीकरण व्हावे अशी अनेक दिवसापासून मागणी  होती. या संदर्भात रुग्णालयाचा ५० … Read more

मुरगूडातील कुस्ती स्पर्धेतून 80 जणांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) – दोन दिवस चाललेल्या मुरगूडातील कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स (19 सुवर्णपदके )व शिवराज हायस्कूल (14 सुवर्णपदके) यांनी वर्चस्व राखले. शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेत्या 80 मल्लांची 16 सप्टेबरपासून होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत’ व्यवस्थापन केंद्र पुरस्कृत योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर, दि. 3 : राज्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र पुरस्कृत योजना ‘औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन’ ही योजना राबविण्यात येते. ही योजना प्रकल्प आधारित असून संशोधन केंद्र, विद्यापीठे यांनी या योजनेअंतर्गत औषधी वनस्पतींच्या विविध घटकांचे प्रकल्प प्रस्ताव मार्गदर्शक सुचनेतील प्रपत्रानुसार सुचना राष्ट्रीय वनस्पती मंडळ (NMPB) नवी दिल्ली, यांना … Read more

सोमय्यांना जोडेमारो आंदोलन

केनवडे फाटा येथे शिवसेना ठाकरे गटामार्फत निदर्शने व्हनाळी (वार्ताहर) : माजी खासदार सोमय्याच्या कथिट चित्रफित निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने केनवडे फाटा ता.कागल येथे सोमय्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह चित्रफित प्रकरणी समाजात तीव्र भावणा उमटत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने … Read more

कृषी दिन ( १ जूलै )

कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून, हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, … Read more

कागलमधील वाळलेल्या ऊसांचे तात्काळ पंचनामे करा – सागर कोंडेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सागर कोंडेकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी कागल : कागल तालुक्यातील पाण्याअभावी वाळलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे, तसेच तालुका कृषी अधिकारी भिंगारदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कागल तालुक्यातील नदी,कालवे, विहीरीच्या पाण्यावर हजारो एकरातील पिके अवलंबून आहेत. माञ, … Read more

आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 45

error: Content is protected !!