एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म

सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये झाली प्रसूती कागल/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील महिलेने कागल शहरातील सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. या मातेची गुंतागुतीची वैद्यकीय प्रसुती तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. तिळ्यासह मातेची तब्येत ठीक आहे. यावेळी तिला दोन मुली व एक मुलगा ही अपत्ये झाली आहेत. तिन्ही बाळाची … Read more

स्वराज्य रक्षक स्वामीनिष्ठ वीर शिवाजी काशीद म्हणजे इतिहासातील त्यागाचे पान होय – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड (शशी दरेकर) – शिवरायां प्रति स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यासाठी प्राणत्याग याचे मुर्तीमंत उदाहरण नरवीर स्वराज्यरक्षक शिवाजी काशीद होय असे उद्‌गार वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी काढले ते मुरगूड येथे नाभिक समाज बांधवांच्या वतिने आयोजित वीर शिवाजी काशीद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. दिग्वीजयसिंह पाटील (मुरगूडकर) हे होते. संजय रणवरे … Read more

कामधेनु पतसंस्थेच्या चेअरमनपदी के. बी. वाडकर तर व्हा. चेअरमनपदी सुर्यकांत मर्दाने

व्हनाळी (वार्ताहर) : व्हनाळी ता. कागल येथील श्री कामधेनू ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्थेच्या चेअरमनपदी के.बी‌.वाडकर यांची तर व्हा.चेअरमनपदी सुर्यकांत रामचंद्र मर्दाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एन. बंडगर यांनी काम पाहिले. यावेळी संचालक एम. टी पोवार, जयसिंग हात्रोटे, रंगराव पाटील, हिंदुराव पाटील, रंगराव दंडवते, बाबुराव पोवार, आनंदी वाडकर, गिता जाधव … Read more

वाघापूर येथील श्री. निनाई विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध

मडिलगे ( जोतिराम पोवार ) : श्री. सचिन दादा घोरपडे यांचे नेतृत्वाखालील श्री निनाई विकास सेवा संस्था मर्यादित वाघापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक( सन २०२२ ते २०२७)बिनविरोध पार पडली. सदर निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ खालील प्रमाणे श्री. तानाजी रावसो दाभोळे चेअरमनपदी तसेच श्री. आनंदराव घोरपडे व्हॉइस चेअरमनपदी निवड करण्यात आली. चेअरमन पदाची संधी … Read more

आषाढी एकादशी निमित्त बाळूमामांच्या बकऱ्यांची सेवा करण्याची वाघापूरातील युवकांची अनोखी परंपरा

मडिलगे (जोतीराम पोवार ) : वाघापूर ता.भुदरगड येथील तब्बल 40 युवकांनी आषाढी एकादशीनिमित्त बोरीबेल ता. दौड, जि. पुणे येथील बाळूमामाच्या बकऱ्यातील बगा क्र. 9 येथील बकरी तळावर जाऊन गेली बारा वर्षांची सेवा बजावण्याची अखंड परंपरा कायम ठेवली येथील लाल बावटा तालुका संघटक बबन जठार व रामचंद्र भोई यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षे आषाढी एकादशी निमित्त … Read more

प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही ताकतीने केला – आमदार हसन मुश्रीफ

कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत कार्यक्रम कसबा सांगाव, दि. १२: कागल विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्यांसह प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही मोठ्या ताकतीने केला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. धरणांच्या बांधकामासाठी घरेदारे, शेतीवाडी त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले. कसबा सांगाव येथील वाकी व वाडदे वसाहतीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक साहित्य … Read more

बाचणी बंधारा पाण्याखाली

बाचणी(तानाजी सोनाळकर): कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाने सुरवात केली असून, सलग चार दिवस संततधार पावसामुळे बाचणी धरण भरले व बंधारा पाण्याखाली गेला असलेने , वाळवा – बाचणी कोल्हापूर मार्गांवरील वाहतूक ही नुकताच कोसळणाऱ्या पावसामुळे बाचणी – कोल्हापूर वाहतूक यामार्गे पूर्ण बंद झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आलेले आहे.

बोगदा फुल्ल अन् रस्ता गुल्ल

कागल(विक्रांत कोरे): कागल शहरानजिक महामार्गावर जाधव मळ्याकडे जाणारा बोगदा आहे. गेल्या दोन दिवसात भरपूर पाऊस पडला आहे. हा बोगदा पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे बोगदा फुल्ल अन् रस्ता गुल्ल अशी अवस्था झाली आहे. राज्य महामार्गावर कागल शहराच्या पश्चिमेस दलित वसाहतीजवळ लोकांना ये -जा करण्यासाठी बोगदा ठेवण्यात आला आहे. महामार्गाच्या पश्चिमेस जाधव मळा, आरटीओ तपासणी नका, … Read more

यमगे आणि सुरुपलीत एकाच रात्रीत चार ठिकाणी चोऱ्यामध्ये लाखाचा मुद्देमाल चोरीस !

पोलिसानीं गस्त सुरु ठेवण्याची नागरीकांतून मागणी मुरगूड : ( शशी दरेकर ) : एकाच रात्रीत यमगेत तीन ठिकाणी तर सुरुपलीत एक अशा चार चोऱ्या झाल्या . यामध्ये लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे . या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीसांच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उभा आहे. मुरगूड -निपाणी मार्गावर असणाऱ्या यमगेतील दोन दुकानासह एका बंगल्यावर व सुुरुपलीत … Read more

मुरगूडमध्ये ” आषाढी एकादशी ” भक्तीमय व उत्साहात साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड शहरामध्ये आषाढी एकादशीनिमित्य कुंभारगल्ली येथिल विठ्ठल मंदीरामध्ये तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज विठ्ठल मंदीर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी मुरगूड येथिल कुंभारगल्ली विठ्ठल मंदीरातून दिंडी शहर प्रदक्षिणासाठी बाहेर पडली . सर्व मुख्य मार्गावरून दिंडी पुन्हा विठ्ठल मंदीरात आली. शहरामध्ये सर्वच ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात … Read more

error: Content is protected !!