सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहु स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राने प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक विधवांचा सन्मान केला. स्वतः घडुया देश घडवुया या व्याख्यानात बोलताना प्रा.तात्यासाहेब मोरे म्हणाले कृतज्ञता, आदर, दुसऱ्यासाठी जिव्हाळा लोप पावत चालला आहे,माया हवी. सन्मान हवा. प्रेमाची भुक हवी आहे. घरातून मानवी मुल्ये नष्ट होत आहेत.मानवी भावभावना सपाट होत आहेत.
कॕ.एल.एस.पाटील बोलताना म्हणाले स्वतंत्र भारतासाठी अनेक युद्धे झाली. सैनिकांनी आपले बलिदान देवून हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. याप्रसंगी शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन इंदुमती पाटील यांनी केले. वरद पाटील यांनी देशभक्तीपर गीत गायले. स्वागत व प्रास्ताविक ज्ञानदीप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डाॕ. अशोक पोवार यांनी केले.
माजी सैनिक विधवा पत्नी अंजना बेनके, केराबाई कांबळे, शांताबाई उबाळे, बाळाबाई ठाणेकर, राधाबाई गोनुगडे, गंगुबाई निकम यांचा सन्मान केला.जिल्हा परिषद आदर्श सेवक पुरस्कारप्राप्त रावसाहेब पोवार,फॕशन डिझायनिंग कोर्स आयटीआय प्रथम क्रमांक प्राप्त शिल्पा निकम,उच्चांकी पोष्ट विमा उतरलेबद्दल संजीव पोवार,कँम्पस इंटरव्ह्युमधून स्टेट बँक आॕफ इंडिया सेल्स मॕनेजरपदी निवड झालेबद्दल विक्रांत पोवार,एम.पी.एस.सी मधून पी.एस.आय.एक्साइज पदी निवड झालेबद्दल लक्ष्मण पोवार, सिद्धनेर्ली विद्यालय व प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कुलमधील दहावी, बारावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले, एन.एम.एम.एस,सारथी, स्काॕलरशीप प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापुरचे पोलिस उपअधिक्षक संभाजी डोंगळे हे होते. यावेळी कु.सुर्या घराळ,लक्ष्मण पाटील यांची मनोगते झाली. कार्यक्रमास एम.बी.पाटील, शहाजी पाटील, एस.एल.पोवार,बळीराम मगदूम, इंदुताई पाटील, वाय.व्ही.पाटील, पत्रकार चंद्रकांत निकम, व्ही.जी.पोवार, पुनम महाडिक, राघु हजारे हे उपस्थित होते. सुत्रसंचलन सुजित खोत तर आभार विक्रांत पोवार यांनी मानले.