बातमी

मुरगूड येथे श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्था व जेष्ठ नागरीक संघाने ” प्रजासत्ताक दिन ” केला साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे भारतीय ७४वा प्रजासत्ताक दिन सुवर्णमहोत्सवी श्री. लक्षीनारायण सह. पतसंस्था व जेष्ठ नागरीक संघाच्या प्रांगणात मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सुवर्णमहोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण सह .पतसंस्थेचे ध्वजारोहन संस्थेचे जेष्ठ संस्थापक संचालक मा. श्री . जवाहर मो . शहा यांच्या शुभहस्ते तर जेष्ठ नागरीक संघाचे ध्वजारोहन संचालक मा. श्री . सिकंदर जमादार यांच्या शुभहस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला.

या ध्वजारोहन कार्यक्रमासाठी श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे ध्वजारोहन मुरगूड विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी तर-जेष्ठ नागरी संघात शिवराज विद्यालयाचे विद्यार्थी -विद्यार्थिनीनीं राष्ट्रगीत गाऊन मानवंदना दिली.

या ध्वजारोहन प्रसंगी जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य तर श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *