बातमी

कागल येथे विराट सिटी मधील इमारतीच्या टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू

कागल(विक्रांत कोरे) : कागल येथे टेरेस वरून पडून तरुणाचा मृत्यू झाला असून इजाज दिलावर नायकवडी वय वर्ष 27 राहणार कागल असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कागल पोलीस ठाण्यात नव्हती. ईजाज नायकवडी हा तरुण कागल बसस्थानका जवळील विराज सिटी येथील जिममध्ये व्यायामाला जात होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे व्यायामासाठी जिम मध्ये गेला. तेथून तो टेरेसवर जाऊन तेथेही व्यायाम करायचा असे समजते.

सकाळी टेरेसवरून वरून पडून गंभीर जखमी झाला. खाली असलेल्या चायनीज सेंटरच्या कापडी छतावरून जोरात खाली आपटला. त्याच्या कानातून व डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही घटना समजताच काहींनी त्यास कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. नंतर तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. सदरची घटनाही आत्महत्या की अन्य काही हे संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके व त्यांच्या सहकारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *