बातमी

वंचित घटकांसाठी युवा ग्रामीण विकास संस्थेचे एचआयव्ही /एड्स जनजागृतीचे समाजकार्य कौतुकास्पद : सपोनि चंद्रकांत शेडगे

स्थलांतरीत कामगाराच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, दिवाळी भेट

मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजातील वंचित, उपेक्षित, समाजातील घटकाचे ऋण फेडणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समाजामध्ये एचआयव्ही /एड्स जनजागृती करणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे समाज विधायक कार्य कौतुकासपद आहे. असे मत उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे  सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी व्यक्त केले.

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील युवा ग्रामीण विकास संस्था, स्थलांतरीत कामगार लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प, जसवंत स्वीटस् , जय अंबे स्वीटस, महामार्ग पोलीस यांच्या वतीने आयोजित स्थलांतरीत कामगाराच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, दिवाळी गोड  कार्यक्रमात ते बोलत होते. 

या कार्यक्रमात सपोनि चंद्रकांत शेडगे यांनी एचआयव्ही संसर्गित मातेच्या मुलीला दत्तक घेतले. त्या मुलींचा शैक्षिणक खर्च उचलला आहे. तर अन्य एचआयव्ही संसर्गित कामगार कुटुंबालाही मदतीचा हात दिला आहे. 

महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या  स. पो. नि.कविता नाईक म्हणाल्या की सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते हे वंचित घटकांसाठी तळमळीने समाजकार्य करत आहेत. युवा संस्थेच्या कर्मचाऱ्याचे समाजकार्य आदर्शवत आहे. समाजाने एचआयव्ही/ एड्स जनजागृती च्या कार्याला हातभार लावणे आवश्यक आहे.

संस्थेचे पिअर लीडर प्रतिक स्वामी यांनी स्वतःच्या पगारातील रक्कमेतून वंचित मुलांसोबत फटाक्याची अतिषबाजी करत मुलांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद वेगळा असल्याचे मत व्यक्त केले.  ग्रामसेवक दत्तात्रय धनगर यांनीही संस्थेच्या कार्याविषयी कौतुक करत यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमास जसवंत स्वीटस् चे श्री. इंद्रलाल चौधरी, श्री.मोहन चौधरी, जयअंबे स्वीटसचे श्री.सागर कोरे,सपोनि कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, फौजदार शंकर कोळी, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, बी. एन. शिंदे, दिनेश लांजेकर,जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय तोरस्कर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष माने, लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील,ग्रामसेवक दत्तात्रय धनगर, हर्षवर्धन धोत्रे, रामचंद्र जाधव, सुभाष सेवा सोसायटीचे संचालक अंगंद गजबर, संदीप शिंदे, सतीश पाटील यांच्या सह प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मले, सचिव सुनील पाटील, प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते, समुपदेशक प्रल्हाद कांबळे, दिपाली सातपुते, शारदा गुरव, सूरज पाटील, विजय राजपाल, आनंद सज्जन, सुजाता राजपाल, वैभव भजनावळे, प्रज्ञा कांबळे, प्रतीक स्वामी हे कर्मचारी उपस्थित होते. मोहन सातपुते यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *