केनवडे फाटा येथे शिवसेना ठाकरे गटामार्फत निदर्शने
व्हनाळी (वार्ताहर) : माजी खासदार सोमय्याच्या कथिट चित्रफित निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने केनवडे फाटा ता.कागल येथे सोमय्याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह चित्रफित प्रकरणी समाजात तीव्र भावणा उमटत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटीका सौ. विद्या गिरी ,सौ.कांचन माने यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सोमय्या यांचा जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी किरीट सोमय्या हाय हाय.. महिलांचा आदर राखलाच पाहिजे… किरीटचं करायच काय.. खाली डोक वर पाय अशा निषेधार्थ घोषणाबाजी करत त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
यावेळी शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटीका सौ. विद्या गिरी ,सौ.कांचन माने,सौ वर्षा करीकट्टी,उपसरपंच शुभांगी पाटील यांनी मनोगत व्यकत करत सोमय्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला.
यावेळी ए.वाय.पाटील, शिवसिंह घाटगे, काकासो सावडकर,एम.टी पोवार, विलास कौंदाडे,दत्ता पाटील,नानासो कांबळे,दिलीप कडवे,धोंडिराम एकशिंगे, शशिकला लोहार,वैशाली गंगाधरे,संगीता मांडरेकर,सरिता पाटील,संगिता माने,छायादेवी इंदलकर आदी उपस्थीत होते.
महिलांचा तिव्र रोष… ।
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी विविध नेत्यांच्या मागे ईडी सारख्या चौकशीचा ससेमीरा लावून अनेकांचे राजकिय जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सोमय्यांचा अश्शील व्हिडीओ प्रसारीत झाल्यामुळे स्वतःच त्यामध्ये ते गुपरटले आहेत. याचा आम्ही महिला भगीनी जाहिर निषेध करीत आहोत. व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करीत महिलांना तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.