बातमी

दिंडी सोहळा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन

वारकरी साहित्य परिषद बैठक संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त इचलकरंजी येथे शुक्रवारी (ता.११) होणाऱ्या भव्य दिंडी सोहळा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाची बैठक नुकतीच वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव यादव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.११) भव्य दिंडी सोहळा स्पर्धा होणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली.यामध्ये कोल्हापूर जिल्हयासह राज्यभरातील वारकरी मंडळी कशी सहभागी होतील यावर चर्चा करण्यात आली.

इचलकरंजी शहर व पंचक्रोशीतील वारकरी, फडकरी, दिंडीकरी, टाळकरी यांचे नियोजन, कार्यक्रम सुरळीत पार पाडणे, दिंडी मार्ग यासह अन्य बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच यावेळी जास्तीत जास्त वारकरी मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव वायदंडे महाराज,शशांक पारगांवकर, कृष्णात पाटील (बापू), शिवाजी शिंदे, विलास बेलेकर, लाला शिंगे यांच्यासह वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *