कागल, ता. ८ : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी शिवराज्य मंच आणि वनमित्र संघटनेतर्फे शहरात पदयात्रा काढण्यात आली. येथील शाहू उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सुरवात झाली.
निपाणी वेशीतून मुख्य रस्यावरून पदयात्रा बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. पदयात्रेदरम्यान कार्यकत्यांनी ‘नफरत छोडो भारत जोडो’, ‘इनक्लाब झिंदाबाद’, ‘संविधान बचाओ देश बचाओ’च्या घोषणा दिल्या. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत तालुक्यातून कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे अशोक शिरोळे यांनी सांगितले.
यामध्ये अॅड. सूर्याजी पोटले, उमेश सूर्यवंशी, गौतम कांबळे, इंद्रजित घाटगे, विजय पाटील, संजय चितारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.