कागल (विक्रांत कोरे) :
प्रॉपर्टीची वाटणी देत नाहीस काय ?असे म्हणत, शिवीगाळ करीत मुलगा व सुनेने सासऱ्यास संडासात कोंडून घातले. दाराच्या फटीतून पेट्रोल आत फेकले व आग लावली आणि पेटवून दिले. प्रॉपर्टीच्या कारणावरून वडीलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना, कागल तालुक्यातील व्हन्नुर येथे सकाळी साडेसहा वाजता घडली.
कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे .शिवाजी देवबा हजारे (मुलगा )सरला शिवाजी हजारे( सून) दोघे राहणार व्हन्नुर अशी आरोपींची नावे आहेत. देवबा बिरू हजारे वय वर्ष 79 वडील हे गंभीर जखमी आहेत.
कागल पोलीसातून मिळालेली माहिती अशी ,मुलगा शिवाजी व सून सरला यांनी देवबा हजारे यांच्याकडे वारंवार प्रॉपर्टीची मागणी केली. पण वडीलांनी त्यास नकार दिला. हा राग मनात धरून सकाळी साडेसहा वाजता वडील संडासात गेल्याचे पाहिले व पती-पत्नीने बाहेरून संडासला बाहेरून कडी लावली . दाराच्या फटीतून पेट्रोल हात फेकले व आग लावली. त्यामुळे देवबा हजारे हे गंभीर जखमी झाले.
जखमीवर उपचारासाठी कोल्हापूरच्या सि पी आर रुग्णालयात पाठविण्यात आले. व्हन्नुर येथील घटनास्थळास करवीर उपविभागी पोलीस अधिकारी श्री निरावडे व कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.