कागल: कागल शहरातील लक्ष्मी टेकडी परिसरात एका अज्ञात व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
Advertisements
सध्या मृत व्यक्तीची कोणतीही ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती किंवा ओळख पटल्यास, त्यांनी तात्काळ कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Advertisements

संपर्क क्रमांक: 02325-244033 (कागल पोलीस ठाणे)