कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (सन २०२६ ते २०३१) आज १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे. जिल्हाभरात एकूण ९९.९६% विक्रमी मतदान झाले असून एकूण ५,४१८ मतदारांपैकी तब्बल ५,४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Advertisements
विक्रमी सहभाग: करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या १० तालुक्यांमध्ये १००% मतदान नोंदवले गेले आहे.
Advertisements


आजरा तालुक्यात ९९.६७% आणि गडहिंग्लज तालुक्यात ९९.७५% मतदान झाले.
एकूण ४,०३८ पुरुष आणि १,३७८ महिला मतदारांनी आपला कौल दिला आहे.
या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार असून कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.