बाळूमामा मंदिरात मंगळसूत्र चोरीचा छडा; दीड लाखांचे दागिने जप्त


कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या चोराचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे २९.५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

Advertisements

१२ ऑक्टोबर रोजी विशाखा वनिता सुरसे तांबवे दर्शनासाठी आल्या असता, गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले होते. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisements

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने हालवले. चोरीचे दागिने विकण्यासाठी शेपटा टॉप येथे आलेल्या संशयित महिलेला १६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!