मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपसभापतीपदी शशिकांत दरेकर यांची निवड

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड ता. कागल येथिल रौप्यमहोत्सवी व सर्वांच्या आपुलकीची असलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपसभापतीपदी शशिकांत गुंडा दरेकर यांची संस्थेच्या सन २०२६ ते २०२८ या साला करीता एकमताने निवड करण्यात आली.

Advertisements

प्रथम सर्वाचे स्वागत सभापती किरण गवाणकर यानीं केले. उपसभापती शशिकांत दरेकर यांचे नांव संचालक नामदेवराव पाटील यानीं सुचविले त्याला संचालक हाजी धोंडीराम मकानदार यानीं अनुमोदन दिले.

Advertisements

     या उपसभापती निवडीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागलचे श्री. समीर जांबोटकर साहेब यानीं निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

   या निवडीनंतर शशिकांत दरेकर म्हणाले सर्व संचालकानी विश्वास दाखवून माझी उपसभापती निवड केली . पुढील काळात संस्थेच्या प्रगतीसाठी आपण सर्व संचालकानां विश्वासात घेऊन आपण कार्यरत राहू अशी ग्वाही त्यानी दिली.

Advertisements

     या वेळी संचालक हाजी धोंडीराम मकानदार यानीं संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत लवकरच संस्थेची अद्यावत व सुसज्य अशी आपल्या सर्वांच्या मनांतील देखण्या वास्तूचे स्वप्न साकार होणार आहे असे सांगून सर्व संचालकांच्या प्रयत्नाने सोळाकूर ता . राधानगर येथे शाखा  लवकरच सुरु होणार असल्याचे त्यानीं सांगितले.

    या निवडीनंतर संस्थेचे चेअरमन, संचालक, कर्मचारी यानी दरेकर यांचा यथोचित सत्कार केला.

   या निवड प्रसंगी सभापती किरण गवाणकर , मावळते उपसभापती प्रकाश सणगर, संचालक प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, नामदेवराव पाटील, धोंडीबा मकानदार, निवास कदम, संदिप कांबळे, संचालिका सौ .सुनंदा जाधव, सौ. रोहिणी तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी जयसिंग कांबळे, रणजीत मोरबाळे, संदिप पाटील, नितीश पाटील, कृष्णात पाटील, विनायक हजारे, संतोष गोधडे, चेतन हासुरकर, सौ. शुभांगी मांडवे, सौ. सुरेखा डवरी, सौ. सिमा मगदूम उपस्थित होते. आभार संचालक निवास कदम यानीं मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!