उरुसाची सेवा संपवून विसावलेले निष्ठावान पाईक: बाळासाहेब बरकाळे यांच्या निधनाने कागल हळहळला

कागल: उरुसाच्या मुख्य दिवशी सर्व धार्मिक विधी आणि मानाचा चौथा गळेफ अत्यंत भक्तिभावाने अर्पण केल्यानंतर घरी गेलेले, पस्तीस वर्षांहून अधिक काळ उरुसातील विविध कार्याची धुरा सांभाळणारे जुने शिवसैनिक बाळासाहेब जयसिंग बरकाळे (वय ६४) यांचा झोपेतच दुर्दैवी अंत झाला.

Advertisements

रविवारी पहाटे सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ते घरी विश्रांतीसाठी गेले होते. सकाळी आठच्या सुमारास घरच्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

Advertisements

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले व कागलमध्ये शिवसेना रुजवणारे ते एक प्रमुख नेते होते. त्यांच्या जाण्याने बरकाळे कुटुंबावर आणि शहरावर शोककिकळा पसरली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात शहरातील जुने शिवसैनिक असलेले बंडोपंत वाळवेकर, राजेंद्र साळोखे आणि आता बाळासाहेब बरकाळे या तिन्ही जिवलग सहकाऱ्यांचा अंत झाल्याने उरूस कमिटी व शहरवासीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!