मुरगूड (शशी दरेकर) : चिमगाव (ता. कागल) येथील आयान सूरज तासीलदार (वय १५) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण चिमगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. मुरगूड येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये तो इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
आज सकाळी घराशेजारी सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या स्लॅबवर पाणी मारत असताना आयान अचानक कोसळला तातडीने त्याला मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले तो शिवराज येथे ९ वी चे वर्गामध्ये शिकत होता. त्याच्या आकास्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Advertisements
