लक्ष्मी टेकडी येथे वाहतुक कोंडीमुळे प्रवासी हैराण

केडीसीसी संचालक भैय्या माने यांनी केली वाहतूक सुरळीत : कागल पोलिसांचे दुर्लक्ष

कागल : शहरालगत असणार्‍या पंचतारांकित एमआयडीसी जवळील मेन हायवेवरील लक्ष्मी टेकडी येथे रविवारी रात्री नऊ ते अकरा वाजण्याच्या वेळेत प्रचंड मोठी वाहतुक कोंडी झाली होती. एमआयडीसीतून सुटणारा कामगार वर्ग व हायवेवरील प्रवासी तसेच कागल शहराचा सुरू असलेला हजरत गैबीपीर ऊरुस यामुळे लोकांची वर्दळ वाढल्यामुळे लक्ष्मी टेकडी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुक कोंडीमुळे वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत होते.

Advertisements

कोल्हापूरहून कागलकडे प्रवास करत असताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने हेही या वाहतुक कोंडीत अडकले होते. पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे आणि वाहतुक कोंडी झाल्यामुळे माने यांनी स्वत: गाडीतून खाली उतरुन विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याचे परिश्रम घेतले. एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतुक कोंडी सुरळीत झाली. भैय्या माने यांच्या या लोकसेवेबद्दल प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.

Advertisements

कागलकडून कोल्हापूरकडे जाणार्‍या मार्गावर लक्ष्मी टेकडी येथे कागल पोलिसांकडून दिवसभर वाहनांची तपासणी सुरु असते. तसेच अवैद्य वाहनांवर कारवाईही केली जाते त्यांच्याकडून पावतीद्वारे रक्कमही वसुल केली जातेे. पण रात्रीच्यावेळी पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे अलिकडे वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रात्रीच्यावेळी घडल्या अनेक दुर्घटना
लक्ष्मी टेकडी या ठिकाणी रात्रीच्यावेळी कोणताही पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे व पोलिस गस्त घालत नसल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपुर्वी एक अज्ञात महिलेने बाजुला असणार्‍या वीजबोर्डाच्या टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच एका अज्ञात पुरूषांनेदेखील आत्महत्या केली आहे. तसेच रात्रीच्यावेळी याच भागातून अवैद्य वाहनांची वाहतुक वाढली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!