मिनी बस व दुचाकीचा अपघात एक ठार

कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ … Read more

जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे टप्पा 2.0 अभियानांतर्गत पूर्ण होणार

कोल्हापूर : जलयुक्त शिवार टप्पा-1 मधील कामे पूर्ण होवून बराच कालावधी होवून गेल्यामुळे या कामांची परिरक्षा, दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी येणारा खर्च जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान 2.0 सदस्य सचिव यांनी दिली आहे. … Read more

मिरवणुकीतील धक्काबुक्कीच्या रागातून डोक्यात मारली खुर्ची

कागल : छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुक दरम्यान झालेली धक्काबुक्कीचा राग मनात धरुन अनिकेत पाटील (सोमवार पेठ, कागल), अनिकेत गुरव (बाळासाहेब ठाकरे चौक, कागल), महेश गुरव (बाळासाहेब ठाकरे चौक, कागल) यांनी स्वप्निल लक्ष्मण मोहीते (किर्लोस्करवाडी), अक्षय आप्पासो मर्दाने यांना मारहाण केली असून याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून स्वप्निल लक्ष्मण मोहीते व त्यांचे मित्र … Read more

मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना

मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य अशा २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ़ श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विरेंद्र मंडलिक, उद्योगपती बाबा जांभळे, साहिल ढमाले, देवदत्त गंगावनवाले, अॅड सुधीर सावर्डेकर प्रमुख उपस्थित होते … Read more

जागतिक उच्च रक्तदाब दिन (14 मे)

वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १४ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यांमधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो. उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात … Read more

अखिलेश पार्क येथे दिवसाढवळ्या चोरी

कागल मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले कागल : येथील अखिलेश पार्क मध्ये अतुल दिवटे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने लोखंडी खिडकीचे ग्रिल तोडुन घरातील कपाट उघडुन कपाटातील रोख २५,०००/- रक्कम चोरून नेली. सदर घटना बुधवार दिनांक १० मे रोजी दुपारी बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. लोकवस्तीत होत असलेल्या चोऱ्यामुळे नागरिकामध्ये भीती चे वातावरण आहे. सदर चोरी … Read more

वाघापूरात बिरदेव जन्मकाळ उत्साहात साजरा

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेवाचा जन्म काळ मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला. सकाळी 7.30 वाजता जन्म काळ सोहळा पार पडल्यानंतर महिलांनी पाळणा गीते गाऊन वातावरण भक्तीमय केले यावेळी झेंडूंच्या फुलांची आकर्षक आरास तसेच बिरदेवाची आकर्षक बैठी पूजा कृष्णा डोणे यांनी मांडली होती. … Read more

शाहू मिल मधील कोल्हापूरी चप्पल स्टॉल ला नागरिकांनी भेट द्यावी

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व 2023 निमित्त शाहू मिल येथे चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी व उत्पादन केंद्रामधील कोल्हापूरी चप्पल विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सुचनेनुसार 14 मे … Read more

विवादित कागल शहर विकास आराखड्या बाबत दि. 23 पासून सुनावणी

बांधकाम विभागात मार्फत शेतकऱ्यांना नोटीसा कागल : बहुचर्चित कागल शहराच्या विकास आराखड्याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन हरकती दाखल केल्यानंतर या हरकतींची सुनावणी तज्ञांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे. एकूण 324 हरकतीची सुनावणी दि. 23 ते 25 मे पर्यंत नगरपालिकेच्या सभागृहात होणार आहे. पहिल्या दिवशी 110, दुसऱ्या दिवशी 110 व तिसऱ्या दिवशी 114 हरकतदारांच्या सुनावणी होणार आहेत. या … Read more

राजर्षि शाहू महाराजांचे लोकोध्दाराचे कार्य प्रेरणादायी ! – जयश्री ढोले – कुराडे

शिवराजमध्ये शाहू महाराजांना अभिवादन मुरगुड ( शशी दरेकर ) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. २० व्या शतकाच्या दोन दशकांमध्ये महाराजांनी परिवर्तनवादी चळवळीला चालना व प्रोत्साहन दिले. आयुष्याची ४८ वर्षे वाट्याला आलेल्या शाहू महाराज यांच्या समाजोद्धाराचे कार्य आजच्यासह पुढील सर्व पिढयांना प्रेरणादायी ठरणारे आहे. असे प्रतिपादन जयश्री ढोले- … Read more

error: Content is protected !!