हातकलंगले तालुक्यातील हुपरी येथे भीषण दुर्घटना; जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीवरून पडून ३० वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू

हुपरी : हातकलंगले तालुक्यातील हुपरी येथे आज सकाळी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील साडेपाच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची लेव्हल तपासत असताना तोल जाऊन झालेल्या अपघातात ३० वर्षीय कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. 

Advertisements

विक्री विद्याधर कांबळे (वय ३०) असे मृत कामगाराचे नाव असून, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

Advertisements

हुपरी नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात साडेपाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची मोठी टाकी आहे. विकी कांबळे हे नेहमीप्रमाणे पाण्याच्या टाकीची लेव्हल तपासत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हुपरी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 

घटनेची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!