मुरगूडमध्ये वसुबारस उत्साहात साजरी

ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात सुवासिनींच्या हस्ते गाय-वासराचे पूजन; महिलांची मोठी गर्दी

मुरगूड (शशी दरेकर) : दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात असलेला वसुबारस हा सण मुरगूड शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात सुवासिनींच्या हस्ते गाय आणि वासराचे विधिवत पूजन करण्यात आले.

Advertisements

विशेष म्हणजे, विनायक चौगले यांच्या गाय आणि वासराचे अंबाबाई मंदिरात दरवर्षी वसुबारसेनिमित्त पूजन केले जाते. ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.

Advertisements

भारतीय संस्कृतीत गाय आणि वासराला मातेचे स्थान दिले जाते. त्यामुळे वसुबारसेच्या दिवशी गाय-वासराचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखविण्याची परंपरा श्रद्धेने जपली जाते. याच परंपरेनुसार  मुरगूडमध्येही वसुबारस सण उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील नागरिकांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाय-वासराचे पूजन करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून गाय-वासराला नैवेद्य अर्पण केला. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, विशाल गुरव, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, अनुबोध गाडगीळ, धोंडीराम खैरे यांच्यासह शहरातील नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!