मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारी व राष्ट्रीय ” आदर्श पतसंस्था ” पुरस्कार मिळवलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुरगूडच्या श्री . लक्ष्मी -नारायण नागरी सह . पतसंस्थेच्या सभागृहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
लक्ष्मी नारायण प्रतिमेचे पूजन श्री . तानाजी नाधवडेकर ( सुरुपली ) , बाळासो चांदेकर ( मुरगूड ) , आनंदा खराडे ( शिंदेवाडी ) यांच्या हस्ते तर,दिपप्रज्वलन श्री . उदय मगदूम ( मुरगूड ) , सुनिल सोनार ( मडिलगे बु॥ ) , व इतर मान्यवर सभासदांच्या हस्ते पार पडले .यानंतर संस्थेचे मयत संचालिका कै . संगिता नेसरीकर यांच्यासह दिवंगत सभासदानां
श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन किरण गवाणकर म्हणाले संस्थेस१५ लाख३७ हजारावर निव्वळ नफा झाला आहे .सभासदानां१३ टक्के लाभांश देण्यात येणार असून संस्था ही प्रगतीपथाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात संस्थापक संचालक श्री . प्रशांत शहा म्हणाले अहवाल सालात१७ कोटी३३ लाख२९ हजारावर ठेवी , तर ठेवीची गुंतवणूक ५ कोटी९४ लाख६७ हजारावर केली असून खेळते भांडवल२० कोटी६७ लाख५० हजार, तर १३ कोटी३९ लाख ९३ हजार कर्जवाटप केले असून ७ कोटी ८४ लाख७६ हजार हे सोने तारणावरील सुरक्षित कर्ज आहे . पुढील काळामध्ये बाजारपेठेतील स्वमालकीची असणारी संस्थेची इमारत आरसीसी व सुसज्य अशी बांधण्यास आम्ही प्रयत्नशिल आहोत ते पुढे म्हणाले संस्थेचे सर्व कार्यक्षम संचालक, तत्पर कर्मचारी वर्ग यामुळे व्यापारी नागरी पतसंस्थेचे हे रोपटे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी काटकसरीने प्रयत्नशील आहोत.
यावेळी १०वीच्या गुणवत्ता धारक विद्यार्थी कु . समृद्धी सुशांत गवाणकर , कु . यश आमित भोई , राजनंदिनी संतोष कल्याणकर व१२वीचे गुणवत्ता धारक विद्यार्थी कु . राजवर्धन जयशिंग पाटील, कु . नेहा चंद्रकांत कुभोजे यांचा सत्कार व बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर श्री . सुदर्शन हुंडेकर यानीं केले . यावेळी रमेश सावंत , राजू कुडवे , नवनाथ डवरी , श्रीकांत खोपडे , शिवाजी खंडागळे , दत्तात्रय तांबट , स्मिता भिलवडीकर यानीं चर्चेत सहभाग घेतला .सभेतील सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सुत्रसंचलन श्री. चंद्रकांत माळवदे ( सर ) यानी केले तर आभार व्हा . चेअरमन श्री. प्रकाश सणगर यानीं मानले. या सभेसाठी संचालक सर्वश्री सातापा पाटील, किशोर पोतदार, हाजी धोंडीबा मकानदार, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, प्रदिप वेसणेकर, निवास कदम, संदिप कांबळे, संचालिका – सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते.