बातमी

लक्ष्मी मंदिर टेकडीजवळ कंटेनर मोटारची धडक

कागल : पुणे – बंगळूर महामार्गावर मोटार आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातात मोटारचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर ही दुर्घटना घडली.

मुंबईतील एका कुटुंबातील काही सदस्य आजोबांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी मोटारने आंबोलीला चालले होते. लक्ष्मी टेकडीच्या उतारावर कार अचानक फास्ट लेनमध्ये घुसून महामार्गाच्या दुभाजकावर गेली महामार्गावर आडवी थांबलेल्या या कारला फास्ट ट्रॅकमधून चाललेल्या न कंटेनरने ठोकरले. यावेळी मोटारमध्ये असलेल्या दोन महिलांसह तिघा तरूणांना लोकांनी कारमधून बाहेर काढले.

सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र कारचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कागल पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक एकेरी केली. तसेच क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *