बातमी

मोटारसायकल – कारच्या धडकेत लिंगनूर येथे तरुण ठार

लिंगनूर दु : भरधाव कारने समोरून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने प्रवीण मोहन गोंधळी (वय ३६, लिंगनूर दु) हा मोटारसायकलस्वार तरुण ठार झाला. सदर घटना शुक्रवार दि. ३ मार्च रोजी लिंगनूर दुमाला (ता.कागल) येथे घडली. गुन्ह्याची फिर्याद सचिन कामले (बागडी गल्ली, लिंगनूर दु) यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे.

अधिक माहितीनुसार, मयत प्रवीण मोहन गोंधळी हा पॅशन प्रो (MH ०९ DQ १३१०) मोटारसायकलने जात असता लिंगनूर – कागल रस्त्यावरील रवींद्र बुजरे यांच्या घरासमोर आरोपी रणजीत सुभाष संकपाळ (वय ४५, रा. लिंगनूर दु) याने त्याच्या वॅगनार (KA – २३ PO १६१) कारने प्रवीण यास समोरून जोरात धडक दिली व त्यास शंभर फुट फरफटत नेले. यात प्रवीण गंभीर जखमी झाला. प्रवीणला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना तो मयत झाला. अधिक तपास कागल पोलीस ठाण्याचे म.पो.ना. रसाळ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *