” चित्रकला व निबंध स्पर्धेलाही उत्स्पूर्त प्रतिसाद “
मुरगूड ( शशी दरेकर ) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुरगूड नगरपालिकेच्यावतीने माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शिला1 फलक अनावरण, पंच प्रण प्रतिज्ञा व वीरांना वंदन असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. नगरपालिकेच्यावतीने येथील हुतात्मा तुकाराम चौकात स्वातंत्र्य सैनिक वारस विठ्ठल भारमल यांच्याहस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
पंचप्रण प्रतिज्ञा , वीरांना वंदन अंतर्गत मुरगूड शहरातील सर्व आजी माजी सैनिक, पोलीस, स्वातंत्र्यसैनिक ‘ शहीद जवान मारुती पाटील यांच्या कुटुंबियांचा सन्मान , तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी पालिका मुख्याधिकारी संदीप घार्गे होते .
यावेळी बोलताना दलितमित्र डी .डी. चौगले म्हणाले , ब्रिटीशांच्या काळात आपल्या देशाला इंग्रजांनी लुटले ‘ आता सुध्दा लुटण्याचेच काम चालू आहे . अनेक प्रश्न नवीन तयार केले जात आहेत . सामाजिक अशांतता आहे त्यामूळे दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईची वेळ आली आहे.
या कार्यक्रमात स्वागत जयवंत गोधडे यांनी केले . रणजित निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विनायक हावळ समाधान पोवार यांची भाषणे झाली . त्याचबरोबर मुरगूड नगरपरिषद मार्फत शालेय विद्यार्थासाठी चित्रकला व निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या. मुरगूड शहरातील सर्वच शाळानीं या स्पर्धेला उस्पूर्तपणे सहभाग घेतला .
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार , नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, दगडू शेणवी, हेमंत पोतदार, बाजीराव गोधडे, एस .व्ही. चौगले, धनाजी गोधडे, पी.व्ही. पाटील यांच्यासह माजी नगरसेवक पालिका अधिकारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमांचे नियोजन मुरगूड नगरपरिषदेच मुख्याधिकारी मा. श्री. संदीप घार्गे, प्रकाश पोतदार, स्नेहल पाटील, रमेश मुन्ने, उत्तम निकम, रणजीत निंबाळकर, जयवंत गोधडे, विनायक रणवरे, अमर कांबळे व आरोग्य कर्मचारी यानी केले. अमर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुनिल पाटील यांनी आभार मानले .