कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सजांचे कोतवाल हे पदे रिक्त असल्याने त्या पदावर कोतवाल भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून) तहसिलदार करवीर यांचे कार्यालय, बी. टी. कॉलेज, शाहुपूरी कोल्हापूर येथे स्वत: अर्ज सादर करावेत, असे आवाहन करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी करवीर, बी. टी. कॉलेज इमारत, शाहुपूरी कोल्हापूर येथे संपर्क साधावा. तसेच दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी नंतर प्राप्त झालेल्या तसेच पोस्ट अथवा कुरिअर मार्फत पाठविलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असेही त्यांनी कळविले आहे.
Advertisements
