बातमी

सिद्धनेर्ली नदीकिनारा परिसराचा कचरामुळे कोंडला श्वास

या प्रदूषणाचा दूधगंगा नदीतील पाण्यावर होणार परीणाम पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता. कागल येथील नदीकिनारा याठिकाणी असणाऱ्या व्यवसाय धारकाडून मोठ्या प्रमाणावर कचरा नदी काठी तसेच एकोंडी रस्त्याकडेला टाकला जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणवर कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.      नदीकिनारा परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणारे छोट मोठे […]

बातमी

चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” आत्मचरित्रास सोलापुरे -संस्थेचा राज्यस्तर पुरस्कार जाहिर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ पत्रकार व लेखक मा . श्री . चंद्रकांत माळवदे ( सर )यानीं लिहिलेल्या ” गोवऱ्या आणि फुले ” या त्यांच्या आत्मचरित्रास महागांव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथिल जेष्ठ साहित्यिक प्रा . रसूल सोलापूरे बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन२०२४चा राज्यस्तर पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. […]

बातमी

पिंपळगाव खुर्द तरुणाची आत्महत्या

पिंपळगाव खुर्द (प्रतिनिधी) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील सुनील चंद्रकांत तेलवेकर वय 28 याने राहत्या घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक माहिती अशी सुनील हा घरी असताना घराजवळच जनावरांचा गोठयात जनावरांना वैरण टाकतो असे सांगून गेला.बराच वेळ तो परत आला नसल्याने पाहण्यासाठी गेल्यावर जनावरांच्या गोठ्यात असणाऱ्या […]

बातमी

चांगभलं च्या गजरात वाघापूरात नुतन जीर्णोद्धार ज्योतिर्लिंग मंदिर पायाभरणी शुभारंभ थाटात संपन्न

संपूर्ण गावातील महिला वर्गाकडून महानैवेद्य गारव्याचे आयोजन मडिगले (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाघापूर ता.भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्वार नूतन मंदिराचा पायाभरणी शुभारंभ राधानगरी भुदरगड चे आमदार सौ व श्री प्रकाश आबिटकर व देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच सौ व श्री बापूसो आरडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. […]

बातमी

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान मुरगूडमध्ये आनंद उत्सव साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी दणदणीत बहुमत मिळवत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ रविवारी घेतली याच आनंदोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात आला. मुरगुड शहरामध्ये  देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुरगूड येतील हिंदूवादी संघटना रामभक्त आणि शिवभक्त यांच्या वतीने शिवतीर्थ मुरगुड समोरील चौकामध्ये फटाके लावून साखर पेढे वाटून […]

बातमी

पैशाचा पावसाच्या नादात ४३ लाखाला गंडा

कागल( विक्रांत कोरे) : पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून भानामतीचा प्रकार केला. तळ घरात पुजा-आर्चा केली. आणि रुपये 43 लाख 22 हजार रुपयाची फसवणूक करून गंडा घातल्याचा प्रकार कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे घडला आहे . यातील सात आरोपी पैकी चार आरोपींना अटक केली असून ,तीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.                 कागल पोलीस […]

बातमी

मुरगूडच्या लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या कूर शाखा अद्ययावत इमारतीचे शानदार उद्घाटन

९० लाखांच्या नुतन इमारतीत स्थलांतर मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील सुवर्णमहोत्सवी व सर्वदूर नांव लौकिक मिळवलेली श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या कूर (ता.भुदरगड) च्या अद्ययावत सोयीनी युक्त अशा नूतन शाखा इमारतीचे उद्‌घाटन गोरंबे (ता. कागल) येथील जंगली महाराज आश्रमाचे अंतर्गत आत्मामालिक ध्यान पीठाचे प्रमुख स्वामी संत प्रवचनकार अमृतानंद महाराज यांच्या हस्ते […]

बातमी

पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी तलाट्यासह एकावर गुन्हा दाखल

तलाठी प्रदीप अनंत कांबळे व गणपती रघुनाथ शेळके यांच्यावर कारवाई मुरगूड ( शशी दरेकर ) – मुगळी ता – कागल गावातील शेत जमिनीच्या हक्कसोड पत्राप्रमाणे शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी व नाव नोंदणी करून डायरी उतारा देण्यासाठी  पाच हजार रुपये  लिंगनूर सर्कल यांच्याकडे तक्रारदार यांना देण्यास प्रोत्साहन दिल्याचे  तपासात निष्पन्न झाल्याने तलाट्यासह  एकावर […]

बातमी

मुरगूड शहर निसर्गमित्रने केली डोंगर माथ्यावर हजारो बियांची हवाई पेरणी

वृक्षारोपण व वृक्षाचा वाढदिवसही साजरा उपक्रमाचे २० वे वर्ष मुरगूड ( शशी दरेकर ) : जागतिक तापमान वाढीच्या महाभयंकर वैश्विक संकटावर वृक्षारोपण ही एकच प्रभावी उपाय योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत डॉ .मा ग गुरव यांनी केले. ते जागतिक पर्यावरण दिनी मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळाचे वतिने आयोजित वृक्षाचा वाढदिवस, परिसरातील डोंगरमाथ्यावर बियांची हवाई […]

बातमी

काँग्रेसच्या विजयात कागल मधून  घाटगे पिता-पुत्रांचे लिड

पहिल्यांदा पांठिबा देवून शेवटपर्यंत प्रचारात उठवले रान व्हनाळी (वार्ताहर) : लोकसभेचे कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना या निवडणूकीत कागल तालुक्य़ातून उदंड प्रतिसाद लाभला. शाहू महाराजांच्या प्रचारादरम्यान बैठका, पदयात्रा आणि जाहिर सभांना झालेली प्रचंड गर्दी आणि विरोधात तालुक्यातील विद्यमान खासदार उमेदवार असूनही त्यांच्या विरोधात उघड- उगड बोलणारे सामान्य लोक यामुळे वैचारीक लढाईत […]